विडा घ्याहो नारायणा । कृष्ण जगत्रजीवना । विनविते रखुमाई। दासी होईल मी कान्हा ॥ धृ.॥

शांती ही नागवेली। पाने घेउनियां करी । मी पण जाळूनिया चुना लावियेला वरी ॥ १॥

वासना फोडुनियां । चूर्ण केली सुपारी। भावार्थकापुरानें । घोळीयेला निर्धारी ॥ विडा. ॥ २॥

विवेक हा कातरंग । रंगी रंगला सुरंग । वैराग्य जायफळ । मिळविलें अभंग ।। विडा. ॥ ३॥

दया ही जाययत्री । क्षमा लवंगा आणिल्या । सुबुध्दि वेलदोडे । शिवरामी अर्पियेले ॥ विडा. ॥ ४॥

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

One Comment

  1. मी स्वतः काव्य लेखन करीत असतो. मी एक मोहिनीराज आरती लिहिली आहे. ती यामध्ये समाविष्ट कशी करता येईल. किंवा मेल आयडी
    कळवला तर मी मेल द्वारे पाठवीत.