दैनंदिन आरती ॥ १॥
जयदेव जयदेव जय आदिमुर्ती। आरती ओवाळू तुज महालयाशक्ति।। जयदेव जयदेव ॥ धृ ॥
देवा लागुन दैत्य पिडू आदारीले। तेथे तुम्ही देवा कैसें कौशल्य केलें। समस्त मिळुनी उदरी मंथन मांडीलें। आपूलिया भक्ता अभय वर दिधले जयदेव जयदेव ॥ १॥
शेषाचा दोरु रवि केला मेरु। मुखी धरुनी दैत्य मंथीता सागरु । पुच्छ धरुनी देव मंथीता सागरु। शेषांच्या विषं दैत्य होय संहारु जयदेव जयदेव ॥ २॥
चौदाची उत्पत्ती तुम्ही केली देवा। अक्षरे अक्षरे तुझिया आदिमाया व्दादश रत्ने स्वंये तुम्ही केशवा। अमृत सुरा आतां वाटुनी द्यावा जयदेव जयदेव ॥ ३॥
ऐसा मंत्र देवा आलासे चित्ता। विभक्ती करोनि ऐसा पहा हो आता। देव दैत्य मिळुनी पृथ्वी हिंडतां। विष्णू झाला स्वयें मोहिनीं तत्वता जयदेव जयदेव॥ ४॥
वैष्णवी मायानिधी वासस्थानी। दैत्य भ्रमिष्ट झाले तये देखोनी । अमृत सुरा म्हणती द्याहो वाटोनी। विभक्त बैसोनि पात्रे मांडोनी जयदेव जयदेव॥ ५॥
अमृत सुरा माया पृथ्वी ते कैसी। योगी जनाप्रत सत्रावी जैसी । तव देवामाजि राहु अमृत प्राशी । तया चंद्रसुर्य दाखवी मोहिनीशी जयदेव जयदेव॥ ६॥
कुंडल चक्रे हानी मोहिनी राहूचें कंठी। शिर उडोनि गेलें आकाशापोटी । तेंचि राहुग्रहण होतसें सृष्टी। दक्षिण माजी धड पृथ्वीचे पाठी जयदेव जयदेव॥ ७॥
धड पडिता धरिलें म्हैशाडौंबरी। माया नखें रोवी त्याच्या उदरीं। तेंची अमृत श्रवलें धरणी येवरी। तोचि ओघ झाला प्रवरा हे थोरी जयंदेव जयदेव॥ ८॥
प्रवरेचे तिरी तुम्ही केला आश्रम। सुर्यकुंड तेथें तीर्थ उत्तम । मधुशांडिल्या मधु मालती संगम । महाक्षेत्र म्हणोनि महालया नाम जयदेव जयदेव॥ ९॥
निधी महीमा शेषा न वर्णनें वाचा। स्नानें करिती तया यम लोक कैचा। विप्र नृसिंह बोले कारुण्य वाचा। वर दिधला महालया नंदन सेवक मी तुमचा जयदेव जयदेव ॥ १०॥
दैनंदिन आरती ॥ २ ॥
आरती विष्णूमूर्ति। जय महालया शक्ति । आरती विष्णूमुर्ति ॥धृ॥ मोहिनी रूप तुझें तुवा आणिलें युक्ति। बैसोनी देव दैत्य सर्व समुदाया पंक्ति वाटिलें एकवट सुरा असुरा युक्ति आरती विष्णूमुर्ति ॥ १॥
चोरुनि राहुनें अमृतपान केलें । देखोनि शशिसुर्य मग तुज जानविलें। चक्र हैं काढोनियां त्याचें शिर छेदीले ग्रासिले रविचंद्रा। ग्रहण तेथोनि झालें ॥ २॥
प्रसिद्ध निधिवास जेथें प्रवरा वाहे । ते स्थळीं वास तुझा भुमिवैकुंठ आहे। भक्तिमुक्ति शीघ्र पावे तव भजनी राहे। गोसावी नंदन म्हणे कृपेनें पाहे ॥ ३॥
रविवार आरती ॥ ३॥
दुर्वासाचे शापे संपत्ती इंद्राची। सिंधुमध्ये पडली ते काळी तुमची। स्तुती करितां करुणा आली देवांची। केला रवि मंद्राचल वासुकी सर्पाची ॥ १॥ जयदेव जयदेव जय मोहिनीराजा। नाटक विष्णुवेषा तत्पर सुरकाजा जयदेव जयदेव ॥धृ ॥
कैवाडे सुर असुर मिळवुनी हे कार्या। सिंधुमंथुनी रत्ने काढिसी गुणवर्या। सर्वे देवा दिधलें देखुनी ते चर्या। बळीने अमृत हरिलें ये नेले अवकार्या ॥ २॥
उदभवला संग्राम असुर देवांसी। घोरांतर बहु संकट देखूनी दृष्टीसी। ते वेळी त्वा धरिली मोहिनी वेशाशी। देखुनि या बळीराजा भुलला स्वरुपासी॥ ३॥
बोले जें तुं करिसी तें आज्ञा मांथा। कैवाडे त्वां पंक्ति बैसविल्या या करिता। एकचि यंत्रे घालुनी मध्ये अमृता। एकचि सुत्रं वाढीसी ऐसी तव सत्ता ॥ ४॥
हातीं एकचि झारी त्या एकचि सूत्रे। दैत्या ठकविसी घालुनीमध्ये अपवित्रे। देवा वाढसी अमृत तें राहू वगत्रे। चोरूनि पळतां कथिलें तेळे रविचंद्रे ॥ ५॥
तेव्हां वामभुजेनें कर्नफुले कैसा। राहू वधिला शिर तें गेले आकाशां। ऐशी विचित्र करणी केली सर्वेशा। स्वरूप सुंदर म्हणोनी मोहिनी म्हाळसा॥ ६॥
मोहिनी होऊनी चिंता इंद्राची हरली। संकटलंपट होऊनी वामांगी धरिली दैत्या ठकवुनी राहू मारूनी तात्काळीं । चरणीं राहु रक्षुनी पूर्ण कृपा केली ॥ ७॥
सोमवार आरती ॥ ४॥
प्रवरातीरनिवासिनी निगमप्रतिपाद्ये पारावारविहारिणि नारायणि हृद्ये प्रपंचसारे जगदाधारे श्रीविद्ये प्रपन्नपालननिरते मुनिवृन्दाराध्ये ॥ १॥ जय देवि जय देवि जय मोहनरूपे । मामिह जननि समुद्धर पतितं भवकूपे ॥ धृ॥
दिव्यसुधाकरवदने कुन्दोज्वलरदने पदनखनिर्जितमदने मधुकैटभकदने । विकसितपंकजनयने पन्नगपतिशयने खगपतिवहने गहने संकटवनदहने ॥ जय देवि. ॥ २॥
मंजिरांकितचरणे मणिमुक्ताभरणे कंचुकिवस्त्रावरणे वक्रांम्बुजधरणे । शक्रामयभयहरणे भूसुरसुखकरणे करूणां कुरु मे शरणे गजनक्रोद्धरणे ॥ जय देवि ॥ ३॥
छित्वा राहुग्रीवां पासि त्वं विबुधान् ददासि मृत्युमनिष्टं पीयूषंविबुधान् । विहरसि दानवऋद्वान् समरे संसिद्धान् मध्वमुनीश्वरवरदे पालय संसिद्धान ॥ जय देवि ॥ ४॥
मंगळवार आरती ॥ ५॥
आदी अंवे जगदीश जगदंतरवासी। जग निर्मुनि जो राहे अक्षय अविनाशि। सनकादिक योगी ज्याचे निजध्यासी । तो हा अनंतनामें ज्याचे प्रवारातीरवासी ॥ १॥ जयदेव जयदेव जय कमलारमणा ॥ देऊनिया वरदाभय दाखव निज चरणा ॥ धृ॥
सिंधु मंथुनी साधन रत्नांचे केलें। विभागिता विभागिमधें अमृत इथं उरलें। धरोनी मोहीनीरुप असुरांसी वधिले । कुटिल राहु त्याचे ताटांकित वधिलें॥ जयदेव जयदेव ॥ २॥
घननीळ तनु पाहांता उपमा पैन दिसे। वामांगी तनया चरणीं डुल्लतसे नारद तुंबर गायन करिती उल्हासें। नरहरीनंदन प्रेमें चरणी डुल्लतसे॥ जयदेव जयदेव ॥ ३॥
बुधवार आरती॥ ६॥
जयदेव जयदेव जय मोहिनीराजा । स्मरतां धावुनि येशी भक्तांच्या काजा। जयदेव जयदेव ॥ धृ ॥
संकट पडतां देवा तुज धावा केला। यास्तव मोहिनी रुप अवतरणे तुजला । अमृत प्राशन करुनि सुरगण तोषविला । असुर जन मधु पानें करोनि भुलवीला॥ १॥
असुरा टाकोनी राहु सुरपंक्ति आला । अधिकारी म्हणोनी तुजला मानवला । चक्रे हे काढोणी त्याचा जिवभाव हरिला। आलें देह सुख भाव चरणी उद्धरिला॥ २॥
विरोध भावें करोनि दैत्या तारिशी । अनन्य भावें शरण आले जे तुजपाशी । इच्छिलें सहजचि मनोरथ ते तु पुरविशी। अमृत दृष्टि पाहुनी भक्ता रक्षीसी ॥ ३॥
गुरुवार आरती॥ ७॥
जयदेव जयदेव जय मोहिनीरूपा । ओंकार स्वरूप चिन्मय चिद्रूपा ॥ धृ॥
गुप्ते गुप्तरूप प्रगट केले । दावूनी कौतुक असुरां मोहिले । भस्मासुरा भस्म क्षणार्ध केले। ते तुझे कर्तृत्व न बोलवे बोलें ॥ १॥
अर्धनारी नटेश्वर म्हणती हो ज्यासी । तोचि हा निजरूप प्रवरातिरवासी । अगाध तुझा महिमा न कळे अगमासी । तो तू मोहिनीराज प्रगट नेवासी ॥ २॥
माहि पौर्णिमेसी उत्सव थोर । देवद्वारी होतसे वाद्यांचा गजर । विप्रसंतर्पणे तृप्त ईश्वर । त्रिकाळ दर्शन घेती सुर आणि असुर॥३॥
ऐसा तु भगवान कुलदैवत ज्याचे । वारी संकट विघ्ने आपुल्या दासाचे। अनंतात्मज विनवीं कुलदैवत कुळीचे । अंती देंसी स्मरण तुझीया नामाचे ॥ ४॥
शुक्रवार आरती॥ ८॥
जयदेवा मोहीनीराजा । वारी मोहास माझ्या॥ दिव्यदृष्टी देऊनिया । पूर्ण करी ममकाजा ॥धृ॥
अर्धनारी नटेश्वर । केला धर्माचा उद्धार ॥ मारुनी दैत्य ठार । पुरविशी भक्त चोजा ॥ १॥
नरनारी रूप एक । केलें दावूनी थक्क॥ पाहता मन वेधे । दिव्य मोहनी तेजा ॥ २॥
अतर्क्य तव माया । मार्ग न दिसे तराया॥ सदया कृपा कर घे । गोड करुनी पुजा ॥ ३॥
शनिवार आरती॥ ९॥
जयदेव जयदेव मोहिनीकमले। पालय पावन चरिते सुंदर गुण विमलें। जयदेव जयदेव ॥ धृ॥
अमृतार्पण विधी दक्षे शशि भास्कर लक्षे । कमलान्तर तश तक्षे तारिती मुनि यक्षे। राहु मस्तक तक्षे लसिता वर कक्षे । तारित नरमूनि यक्षे शंभु प्रतिपक्षे ॥ १॥
कर घृत वारित चक्रे खंडित-खल-नक्रे। रक्षित रिपु भये शुक्रे मर्दित रिपुचक्रे । न्यासामणि शुक्रे निर्मिती भवचक्रे । दशरथ वंशी विचक्रे खंडित खल नक्रे ॥ २॥
नवमणि चंचल हारे खिल जगदाधारे। अभिनव लिलाकारे चामर परिवारे । अगणित तांडव पार घृत जन उपकारें। वैकुंठ स्वविवारे त्र्यंबक रितपुरे ॥ ३॥
मी स्वतः एक मोहिनी राज आरती लिहिली आहे.
ती यात कशी घेता येईल
तुम्ही तुमची आरती ७७०९००३०८८ या नंबर वर व्हाट्सअँप करू शकता.
व्हाट्सअप वर पाठवली आहे