हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका, म्हणती राधिका भावे भक्ती ओवाळीती यादव कुळटिळका ॥ धृ ॥

एकीकडे राही एकीकडे रखुमाई । भावे ओवाळीता हरि जाला दो ठायी॥ १ ॥

अष्ठाधीक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा । ज्या ज्यांनी प्रार्थिला गेला तयांचिया घरा ॥ २ ॥

एका जनार्दनी हरि तू लाघवी होसी । इतक्याही भोगुनी ब्रम्हचारी म्हणवीसी ॥ ३ ॥

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *