देव चालले शेजेला । लक्ष्मीच्या मंदिरा ।। धृ.।।
कुंकूम केशर घालूनी सडे। पाऊल उमटले गोजिरे ।। १।। देव चालले
मागे घालुनि पायघड्या । पाऊल ठेवले मागेपुढे ।। २।। देव चालले
उध्दव अक्रुड दोहीकडे। नारद गात असे पुढे ।। ३।। देव चालले
देव पाहति अंबरी । पुष्पे वर्षती नाना परी ।। ४।। देव चालले
देव मंदिरी पावले। लक्ष्मी लागी आनंद झाला ।। ५।। देव चालले
देव बैसले मंचकावरि । विणा वाजवितो हरि ।। ६।। देव चालले
देव पावले मंदिरी। एका जनार्दनी आनंद अवघा झाला प्रेमानंद ।। ७ ।। देव चालले