ब्रम्हेन्द्रादी समस्त देव मिळूनी, विरोचना बोधिले । किंक्षीराब्धि मंथुनी दुर्लभ सुधा, काढोनी घ्यावा बळे ।। निष्पा निष्प तुम्हा आम्हा सहित, असा संकेत केला पहा। भक्ताची मनकामना पुरवि जो, तो मोहिनीराजा हा ॥ १ ॥
शेषेवेष्टुनी मंद्राचल बळे, भूमीहूनी आगळा काढिला । देवी दैत्यगणी महाश्रम वसे, सिंधुतटा आणिला ।। रजु वासुकिचा करूनि मथिता, नर्मग्न आद्री महा। पुष्टी कुर्म पणे गिरी उचलिला, तो मोहिनीराजा हा ॥ २ ॥
तो मंद्राचल डोलता न टिके, देवादिका दानवा। त्याचे मस्ताकि हस्त ठेवूनी उभा, ठाके स्वये ते धवा ।। आनंदे मथिता चतुर्दश शुभे, रत्ने निघाली पहा। वस्तु वाटुनि दे विभाग करूनी, तो मोहिनीराजा हा ॥ ३ ॥
दैत्यानी अमृतार्थ भांडोनि स्वये, युद्धासि आले बळे । तेव्हा त्वा मोहिनी रूप घेऊनी तया, शब्दामृते मोहिले ।। ताटांकिचा आयोग्य राहु वधिला, व्यक्ति जयाचा दहा। भक्ताची मनकामना पुरवि जो, तो मोहिनीराजा हा ॥ ४ ॥
भक्ती सौरभ पंचरत्न सुमने, पुष्पांजली अर्पिली। पायी मस्तक ठेविताशी करूणा, श्री मोहिनी तोषवी ।। आता इच्छित मागणे जरी तुम्हा, कामधेनू दुहा। भक्ता भिष्ट निवास नगरी जो, तो मोहिनीराजा हा ॥ ५ ॥